ENGLISH | MARATHI
BRAMHAPURI MUNICIPAL COUNCIL, BRAMHAPURI

ब्रम्हपुरी नगरपरिषद, ब्रम्हपुरी


आमच्या बद्दल


ब्रम्हपुरीचे नाव ब्राह्मण शब्दावरून आले आहे, जे स्थानिक लोकांच्या मते याच्या आसपास असलेल्या क्षेत्रातील ब्राह्मणांचे वस्तीवर आधारित होते. याच्या आसपास असलेल्या क्षेत्रातील ब्राह्मणांचे वस्तीवर आधारित होते. ब्रम्हपुरी ऐतिहासिक दृष्ट्या एक महत्त्वाचे स्थान आहे. शहरातील प्राचीन मंदिरं आहे. शहरातील प्राचीन मंदिरं, वाड्या, घराणे यांचा उल्लेख स्थानिक इतिहासात केला जातो.

ब्रम्हपुरी हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, शहराचा नियोजित व शाश्वत विकास साध्य करण्याच्या दृष्टीने ब्रम्हपुरी नगरपरिषद कार्यरत आहे. नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा प्रभावी, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देणे, शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे तसेच पर्यावरण संवर्धनास प्राधान्य देणे, हे नगरपरिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

शासनाच्या विविध योजना व विकासात्मक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांचे जीवनमान उंचावणे, ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकाभिमुख सेवा सुलभ करणे आणि लोकसहभागातून शहराचा सर्वांगीण विकास साधणे यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे.